माजी सहसंचालक डॅा.सतीश उमरीकर यांचे आवाहन
जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातूर/ दि.१३/०७/२०२१
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय,(भूगोल विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना), लातूर आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन एक दिवसीय राज्यस्तरीय वेबीनार “भूजल पुनर्भरण काळाची गरज आणि साक्षरता अभियान या विषयावर आयोजित करण्यात आले होते यामध्ये ते पावसाच्या पाण्याचे संकलन, पुनर्भरण आणि ग्रामस्वच्छता या विषयावर मार्गदर्शन करतांना बोलत होते
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा औरंगाबादचे कार्यकारी अभियंता मनोज सुरडकर, बळीराम केंद्रे, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॅा.भा.ना.संगनवार, भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.बाळासाहेब गोडबोले, कार्यक्रमाधिकारी डॅा.रत्नाकर बेडगे, डॅा.शिवप्रसाद डोंगरे, डॅा.संजय गवई व समन्वयक अधिकारी कु.स्नेहा गोसावी आदींची उपस्थिती होती.
हा कार्यक्रम भूजल सर्वेक्षण विभाग, पुणे येथील संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी व सहसंचालक डॅा.पंचमलाल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.