अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव तालुक्यात सर्वात जास्त पशू धन असलेल्या मेडशी परिसरातील पशू पालकांना शासनाच्या वतीने पावसाळी पूर्वी जनावरावरील फऱ्या व घटसर्प आजाराचे नियोजन म्हणून प्रतिबंधनात्मक लसीचे लसीकरण मोहीम राबविली जात आहे.परिसरातील पशू पालकाने लवकरात लवकर लसीकरण करून घ्या जेणे करून सदर गंभीर आजारचे लागण होऊन जनावर दगावणार किंवा दुःखी रोगी होणार नाही .पावसाळ्यात जनावरे आजारी पडण्याचे व त्यामुळे होणाऱ्या मरतुकीचे प्रमाण सर्वाधिक असते. जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर उपचार करण्यापेक्षा या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अधिक काळजी घेणे अधिक हितकारक ठरते.अतिवृष्टीमुळे वातावरणातील ओलावा, सूर्यप्रकाशाचा अभाव, ढगाळ वातावरण गोठ्यातील ओलावा चारापाण्याची ढासळलेली प्रत या एकूणच परिस्थितीमुळे जनावरांच्या शरीर प्रक्रियेवर ताण पडतो.जनावरांमध्ये आजारांचे प्रमाण किंवा साथीचे रोग जसे घटसर्प, फऱ्या इत्यादी उद्भवतात. अशा वेळी शक्य असल्यास आंबवणाचे प्रमाण वाढवून द्यावे. प्रामुख्याने दुभत्या आणि व्यायला झालेल्या गाई, म्हशींची अन्नघटकांची शारीरिक मागणी पूर्ण करण्याकरिता आंबवण्याचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे.फऱ्या रोगाची लक्षणे म्हणजे एकाकी ताप येतो, मागचा पाय लंगडतो. मांसल भागाला सूज येते. सूज दाबल्यास चरचर आवाज येतो. या रोगासाठी प्रतिबंधक करण्यासाठी दरवर्षी सुरवातीला जनावरांना लसीकरण करून घ्यावे व घटसर्प या रोगात जनावर एकाएकी आजारी पडते. खाणे पिणे बंद होते. अंगात ताप भरतो. गळ्याला सूज येऊन डोळे खोल जातात. घशाची घरघर सुरू होते. या रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी निरोगी जनावरांना लसीकरण करण्यात येते आहे.या प्रसंगी उपस्थीत डॉ एस एस गोरे प्रभारी पशुधन विकास अधिकारी श्री एम बी सोनारगण पट्टीबंधक, श्री एस के पवार परिचर, श्री ए के वैद्य परिचर ह्यांच्या सह विशाल सरकटे, सोहेल पठाण, व पशुमालक अजिंक्य मेडशीकर यांची उपस्थिती होती