राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
सिरोंचा :- गडचिरोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक गडचिरोली समीर शेख, मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी सोमय मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग सिरोचा प्रशांत स्वामी, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सिरोंचा अजय अहिरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिरोचा येथे आज सोमवार दि 12 जुलै रोजी सिरोंचा पोलीस ठाण्यात भव्य कृषी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी कृषी मंडळ अधिकारी सिरोंचा रोकडे, कृषी अधिकारी पंचायत समिती प्रताप कोपनकर, विनोद पांचाळ, पशुसंवर्धन अधिकारी सिरोंचा बांबोर्दे, वनपाल निमसरकर, महसूलचे मंडळ अधिकारी गेडाम, बांडे, तलाठी पुंगाटी, पदा, ग्रामसेवक सुरेश मोहुरले, कृषी सहाय्यक आत्राम, पिळव, लांजेवार, माजी नगराध्यक्ष पेदापल्ली, तसेच पोलीस स्टेशन सिरोचा हद्दीमधील पोलीस पाटील सरपंच व 80 ते 100 शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग पंचायत समिती पशुवैद्यकीय विभाग वन विभाग व महसूल विभाग यांचे पदाधिकारी यांनी आपापले विभागामार्फत शेतकऱ्यांविषयी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच सदर योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा याबाबत प्रोत्साहन दिले. मेळाव्यामध्ये प्रगतशील शेतकरी बालया शिरबोईना, लक्ष्मण पेदापल्ली, वेदांतम यांचा सत्कार करून त्यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात आले. मेळाव्यातील शेतकरी बांधवांना कृषी अधिकारी रोकडे, पांचाळ यांनी योग्य मार्गदर्शन करून सेंद्रिय शेती करण्यावर भर देण्यात यावा याबाबत मार्गदर्शन केले. मेळाव्यामध्ये आम्ही पोलीस उपनिरीक्षक श्रीकिशन कांदे यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. मेळाव्या मधील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत धान लागवडीचे बी वाटप करण्यात आले तसेच विविध प्रकारच्या फळझाडांचे वाटप करण्यात आले. तसेच मेळाव्या करिता जमलेल्या शेतकरी बांधवांची व विविध पदाधिकाऱ्यांची अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. मेळावा करिता पोलीस उपनिरीक्षक धनराज सेलोकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल ढोरे, या हेडकॉन्स्टेबल चव्हाण, पोलिस नायक गावडे व पोलीस स्टेशन सिरोंचा येथील स्टाफ उपस्थित होते.











