पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड दि.12 मृग नक्षत्रानंतर पावसाने दडी मारून रविवार पासुन पुनरागमन केल्यामुळे शेतकऱ्याचा चेहऱ्यावर आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिकांची परिस्थिती दयनीय झाली होती परंतु रविवारी सायंकाळी पासून सुरू झालेल्या पावसाने आज सोमवारी सायंकाळ पासून सुद्धा विजेच्या कड कड्या सह दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला ज्या शेतकऱ्याचा पेरण्या रखडल्या त्या सुध्दा आता त्या पूर्ण होणार आहे रविवार पासून सुरू झालेल्या पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी वर्गात भरपूर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .