मधुकर केदार
शहर प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव: समाजाच्या कल्याणा करिता समर्पित झालेले जीवन हे सर्वोत्तम आणि परोपकारी जीवन असते.लोकनेते मारुतराव घुले पाटील साहेब यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी खर्ची घातल्याने ते खऱ्या अर्थाने परोपकारी जीवन जगले असे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगडचे उत्तराधिकारी महंत प्रकाशानंदगिरी महाराज यांनी केले.नेवासा तालुक्यातील भेंडा येथे लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे २१ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रकाशानंदगिरी महाराज बोलत होते.प्रारंभी श्रीक्षेत्र ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख,महंत सुनिलगिरीजी महाराज, कारखाना व उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,संचालक अँड देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे,तज्ञ संचालक डॉ क्षितिज घुले पाटील,मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गड़ाख,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष काशिनाथ नवले,राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे आदींनी स्व घुले पाटील यांचे समाधीस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.प्रकाशानंदगिरी महाराज पुढे म्हणाले की, साधु-संत, वारकरी,शेतकरी कामगार ऊस तोडणी मजूर यांच्यावर साहेबांचे नितांत प्रेम होते.घुले पाटील हे या परिसराचे परिस होते,ज्याना-ज्यांना त्यांचा परिसस्पर्श झाला त्या सर्वांचे सोने झाले. कारखाना स्थापन करताना मशिनरीची पहिली ट्रक ज्ञानेश्वर मंदिरात आणली, कारखान्याला ज्ञानेश्वर माऊलींचे नाव देणारे साहेब हे कारखाना परिसराचे माऊली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.शिवाजी महाराज देशमुख म्हणाले,ज्ञानेश्वर कारखान्याला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे.ज्ञानेश्वरीतील ओवी प्रमाणे झाड जसे लावतो त्यालाही आणि तोडतो त्याला ही सावली देते,त्याचप्रमाणे घुले पाटलांनी त्यांच्या संगतीत आलेल्या सर्वांनाच त्यांनी सामावून घेतले.कोणताही दुजाभाव केला नाही.परोपकारी जीवन जगून अनेकांचे संसार फुलविण्याचे काम त्यांनी केले. ज्ञानेश्वर माऊली आणि साहेब यांच धर्मसत्ता-राजसत्तेच नात वै बंशी महाराज तांबे यांनी जोडलेलं आहे.समाजातील अडचणीत सापडलेल्यांना योग्य वाट दाखविन्याचे काम त्यांनी केले.महंत सुनीलगिरी महाराज, कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, माजी उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,दिलीपराव लांडे, संचालक पंडितराव भोसले,संचालक बबनराव भुसारी,शिवाजी कोलते,अशोकराव मिसाळ,मच्छीन्द्र म्हस्के,जनार्दन कदम,भाऊसाहेब कांगणे,विष्णू जगदाळे,संतोष पावशे, दीपक नन्नवरे,सखाराम लव्हाळे,डॉ शिवाजी शिंदे,मोहनराव गायकवाड,गणेश गव्हाणे,जनार्दन पटारे,दादासाहेब गंडाळ,अजित मुरकुटे,नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे,नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती किशोर जोजार,तुकाराम मिसाळ, सरपंच दादा निपुंगे,राजाजी बुधवंत, बाळासाहेब नवले,उत्तमराव आहेर, रामनाथ राजपुरे,बाळासाहेब मरकड, बाजीराव मुंगसे,घुले पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस,रामभाऊ पाऊलबुद्धे,अशोक वायकर,दत्तात्रय खाटीक,रामदास गोल्हार,कचरदास गुंदेचा,पांडुरंग उभेदळ,ताहेर पटेल, संजय फडके,कॉ.सुभाष लांडे, तुकाराम नवले,मिलिंद कुलकर्णी, शिवाजीराव गवळी,तुकाराम काळे मामा,अमोल अभंग,गफूर बागवान, महंमद आत्तार,भैय्यासाहेब देशमुख संचलिका रत्नमाला नवले,लताताई मिसाळ,सरपंच उषाताई मिसाळ,रामनाथ म काळेगावकर, अंकुश महाराज कादे,शिवाजी महाराज बिरदवडे,नवनाथ महाराज काळे, मच्छिंद्र महाराज भोसले, कल्याण महाराज काळे,भाऊसाहेब आगळे,शेषराव दुकळे,कल्याण नेमाने,राजेंद्र ढमढेरे,सुधाकर गव्हाणे, विष्णुपंत बोडखे,नानासाहेब मडके, मोहन गलांडे,राम अंधारे,ज्ञानदेव घोरतळे,भाऊराव भोंगळे,कृष्णा ढोरकुले,सुधाकर तहकीक,संभाजी मडके,पंडित भागवत गुरुजी,मधुकर गोरे,राजेंद्र नरोटे,मंगेश थोरात, जनार्दन शेळके,दत्तात्रय विधाटे,पुरुषोत्तम सर्जे,दत्तात्रय काळे, हुकूम बाबा नवले,भास्कर खेडकर, बबेराव भालसिंग,रमेश दुसुंगे, रामभाऊ जगताप,दिलीपराव मोटे, अनिल मडके,मोहनराव देशमुख, वैभव नवले,बापूसाहेब खताळ, काकासाहेब काळे,अशोक मंडलिक, अंबादास कोरडे,जगन्नाथ कोरडे, एकनाथ कसाळ,गणेश खंबरे, भगवान गंगावणे,अशोक मेरड, बाळासाहेब ताठे,दत्तात्रय खाटीक, शिवाजी मते,डॉ रावसाहेब फुलारी, डॉ बाळासाहेब कोलते,भारत गुंजाळ, राजू पसैय्या,दौलत देशमुख,हनुमान गटकळ,ज्ञानदेव दहातोंडे,मोहन भगत,भानुदास सुपारे,राजा पाऊलबुद्धे,कामगार संचालक संभाजी माळवदे,जना कदम,गोरक्षनाथ कापसे,भानुदास कावरे,भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते.


