लोकमत सखी मंच तर्फे रक्तदान शिबीर संपन्न.
36 रक्तदात्यांनी केले रक्तदान.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
नागभीड (१२ जुलै)- नागभीड तालुक्यातील तळोधी बा. येथे आज लोकमत सखी मंच तर्फे जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर यांचे विद्यमाने स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हे पुण्याचे काम लोकमत परिवार करीत आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीच्या कठीण काळात रक्ताची खूप मोठी गरज असतो व अश्या कठीण काळात लोकमत तर्फे आज तळोधी बा. येथील साई मंदिर येथील सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटन खोजराम मरस्कोल्हे जी.प.सदस्य चंद्रपूर,अध्यक्षा छाया मदनकार सरपंच तळोधी बा., प्रमुख पाहुणे डॉ.कामडी प्रा.आ.केंद्र तळोधी, होमराज लांजेवार सरपंच महासंघ जिल्हाध्यक्ष,डॉ.रघुनाथ बोरकर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नागभीड,होमदेव मेश्राम माजी तालुका अध्यक्ष भाजपा,आकाश साखरे उपनिरीक्षक तळोधी, डॉ.गौरव देशमुख व आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन संजय अगडे यांनी केले असून आभार प्रदर्शन राजेश बारसागडे अध्यक्ष तळोधी पत्रकार संघ तळोधी यांनी केले या कार्यक्रमाला घनश्याम नवघडे लोकमत तालुका प्रतिनिधी यांनी सहकार्य केले. लोकमत च्या माध्यमातून होत असलेला हा उपक्रम उत्कृष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले लोकमत तर्फे रक्तदात्यांना एक प्रमाणपत्र व उत्कृष्ट बॅग भेट देण्यात आली. लोकमत सखी तर्फे झालेल्या या रक्तदान शिबिरात आज 36 लोकांनी रक्तदान केले आहे.