दादासाहेब येढे
तालुका प्रतिनिधी, पाथर्डी
पाथर्डी : वित्त विभागामध्ये आपल्या कर्तव्यदक्षता, कार्यतत्परता, आणि कार्यक्षमतेची चमक दाखवलेल्या सोमनाथ बबन काकडे यांची एकात्मिक बालविकास प्रकल्प नवी मुंबई येथे सहाय्यक आयुक्त (लेखा) या पदावर राज्य सरकारने नियुक्त केली आहे. या अगोदर ते अधिदान- लेखा कार्यालय मुंबई येथे सहाय्यक अधिदान व लेखाधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यांनी तेथे उत्कृष्ट काम केले. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्यावर ही नव्याने जबाबदारी सोपवली आहे. याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील सोमठाणे ता.पाथर्डी तालुक्याचे मूळ रहिवासी असणारे सोमनाथ काकडे हे अगोदर जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. वित्त विभागामध्ये क्लास वन अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पारदर्शक, आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांनी अल्प कालावधीमध्ये नावलौकिक प्राप्त केला. कामाचा उरक आणि निपटारा करणारे वित्त विभागाचे सहाय्यक संचालक म्हणूनही त्यांनी छाप पाडली. मुंबईच्या अधिदान व लेखा कार्यालयात ते अगोदर कार्यरत होते. तेथे सुद्धा त्यांच्या प्रशासकीय कार्य कुशलतेचा ठसा उमटला. आपले शासकीय कर्तव्य बजावत असताना सामाजिक क्षेत्रातहीकडे सोमनाथ काकडे बांधिलकी जपतात. प्रचंड वाचन आणि व्यासंग नवीन नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा छंद अशा अनेक गोष्टी मिळून एक अष्टपैलूत्व प्राप्त करणाऱ्या काकडे यांची वित्त विभागाने एकात्मिक बालविकास प्रकल्प नवी मुंबई येथील आयुक्त कार्यालयात सहाय्यक आयुक्त (लेखा) या पदावर नियुक्ती केली आहे. राज्यातील सर्व अंगणवाड्या या कार्यालयाच्या अखत्यारी येतात. या संदर्भातील लेखा आणि वित्तीय कामकाजाची जबाबदारी सोमनाथ काकडे यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.