विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : तालुका जीनिंग अँड प्रसिंग सोसायटीच्या निवडणुकीत अतिशय चुरस निर्माण होऊन ही निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव करत सत्यशोधक पॅनलने बाजी मारली. सत्यशोधक शेतकरी संघ पॅनल चा विजय होऊन त्यांचे नऊ उमेदवार विजयी झाले होते महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरेचे सात उमेदवार विजयी झाले. आज दिनांक 30 जुलै रोजी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये अध्यक्षस्थानी माजी आमदार भाऊसाहेब माने यांचे सुपुत्र शिवाजीराव माने तर उपाध्यक्षपदी एडवोकेट जितेंद्र पवार यांची निवड करण्यात आली.


