सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी, बीड
बीड : दि. ३० जून २०२३ बीड जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयाकडून अनु.जाती जमाती यांना अट्रोसिटी कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या नुकसान भरपाईत समाज कल्याण कार्यालयातील नुकसान भरपाई वितरण विभागाचे कर्मचारी नितीन पतंगे याने परळी वैजनाथ येथील आशा बन्सी खनपटे यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.बीड जिल्ह्यातील समाज कल्याण अधिकारी कार्यालयात अनु.जाती-जमातीनां अट्रोसिटी कायद्याअंतर्गत पिडीत कुटूंबियांना नुकसान भरपाई शासनाकडून मिळत असते या मिळणाऱ्या नुकसान भरपाईत सुध्दा बीड जिल्ह्यातील कर्मचारी यांच्याकडून पिडीत कुटूंबियांना पुर्ण नुकसानभरपाई देण्यात येत नसल्याचे या प्रकरणातून उघड झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील आणि परळी वैजनाथ शहरातील साठे नगरच्या रहिवाशी आशा बन्सी खनपटे यांना शासनामार्फत अट्रोसिटी कायद्याअंतर्गत ८ लाख २४ हजार रूपये नुकसानभरपाई मिळणार होती परंतु पीडितांच्या कुटुंबास फक्त ७ लाख ३४ हजार रूपये रक्कम मिळाली असून ९००००हजार रूपये वरिष्ठ अधिकाऱ्यांना रक्कम, कमीशन देण्याच्या कारणाने देण्यासाठी तसेच घरकूल देण्याच्या आणि आणखीन रक्कम देण्याच्या प्रलोभनातून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा सर्व प्रकार बीड जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयात अनु.जाती-जमाती अट्रोसिटी कायद्याच्या नुकसानभरपाई वितरण विभागात काम करणाऱ्या नितीन पतंगे नावाच्या कर्मचाऱ्यांने केला असल्याची माहिती पीडीता आशा बन्सी खनपटे यांनी दिली असून मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून याप्रकरणी मा. जिल्हाधिकारी यांनी पिडीत कुटूंबियांना न्याय देऊन अशा पध्दतीने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करून निलंबित करावे अशी मागणी सामान्य जनतेतून येत आहे.