रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : विदर्भभूच्या कुशीतील दैदिप्यमान ज्ञान सूर्य मृत्युंजयी युगद्रष्टा संत श्री वासुदेव जी महाराज यांच्या चौदाव्या पुण्यतिथी महोत्सवाचे श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड , श्री हनुमान संस्थान बोरगाव वराळे , श्री संत भास्कर महाराज मंदिर तामसी वाशिम , श्री वैष्णव ज्ञान मंदिर वडाळी सटवाई , श्रीमंत अहिल्यादेवी होळकर वाडा , श्री राम कृष्ण हरी वृद्धाश्रम व विदर्भ कन्या आई रुखमाबाई सेवा ट्रस्ट शाखा पंढरपूर आदि अनेक ठिकाणी आषाढ शुद्ध एकादशी दिनांक २९ l ६ l२०२३ रोजी भव्य आयोजन करण्यात आलेले आहे. ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड या ठिकाणी संत श्री वासुदेव जी महाराज स्मृति मंदिरामध्ये दिनांक २७ l ६ ते ३ l७ l २०२३ पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ; त्यात आषाढ शुद्ध दशमीला संत श्री वासुदेव जी महाराज यांचे पिताश्री श्री संत पुंडलिक बाबा यांचा पुण्यतिथी महोत्सव तसेच आषाघ शुद्ध एकादशीला पहाटे श्री हरिदास पाटील वाघ , श्री गजानन पांडे , विनोद रहाणे , छोटू पाटील लवाळेआदि भक्त मंडळींच्या उपस्थितीमध्ये षोडशोपचारे श्रींच्या मूर्तीचा अभिषेक होऊन, परिसरातील दानापूर , सोगळा सौंदळा , वारखेड आदी ठिकाणच्या दिंड्यांचे स्वागत तथा एकादशी निमित्ताने फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न होईल. तसेच राम कृष्ण हरी वृद्धाश्रम पंढरपूर या ठिकाणी सुद्धा दशमी एकादशी व द्वादशी असा त्रिदिवशीय कार्यक्रम उत्साहात संपन्न होईल . तसेच येत्या ३ l ७ l ला गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड येथेल संत श्री वासुदेव जी महाराजांच्या मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक कळवितात.