आदिनाथ दशरथे
तालुका प्रतिनिधी वसमत
वसमत : ऍड चंद्रशेखर भाई आजाद हे उतर प्रदेशातील सहारणपूर जिल्ह्यातील देवबंद या ठिकाणी ते घरगुती कार्यक्रमाला कार मध्ये जात होते तेव्हा काही मनुवादी विचार सराणीच्या जातीयवादी गुंडानी त्यांच्या कारवर गोळीबार केला यामध्ये एक गोळी कारच्या दरवाजातून आरपार जाऊन त्यांच्या कमरेजवळ लागली असून जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सदरचा हल्ला हा सुनियोजित कट असून यापूर्वी ही त्यांच्यावर जीवघेना हल्ला झाला होता, भाई चंद्रशेखर आझाद यांना सुरक्षा द्यावी याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार केले आहेत परंतु इथल्या बीजेपी सरकारने याबाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे जे कोणी हल्लेखोर आहेत त्या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करावे तसेच भाई चंद्रशेखर आझाद यांना z+ सुरक्षा पुरवावी अन्यथा राष्ट्रीय अध्यक्ष विनयजी रतन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने संपूर्ण भारत बंद करू याची नोंद घ्यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली त्यावेळी
महाराष्ट्र प्रदेश सचिव आनंद खरे, हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख हर्षददादा आझादे, वसमत तालुका प्रमुख नवनाथ घाते, तालुका कोषाध्यक्ष रामा खापरे, तालुका कार्याध्यक्ष अनिल थोरात,तालुका उपाध्यक्ष प्रमोद वाहुळे,जिल्हा सचसचिव वंबआ राहुल करवंदे,जिल्हा युवा उपाध्यक्ष वंबआ. प्रवीण बाराहटे,जेष्ठ मार्गदर्शक उत्तममामा करवंदे, शाखा प्रमुख चंदगव्हाण प्रिया बगाटे,शाखा सहसचिव विमलबाई तपासे,मराठवाडा अध्यक्ष आरपीआय कामगार आघाडी कैलास निकाळजे,आरपीआय कामगार आघाडी विठ्ठल मस्के, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर मस्के, पप्पूभाऊ ढेंबरे, साई गायकवाड, अशोक धडके, आदित्य खरे, देविदास सूर्यवंशी, कपिल जाधव ऋतिक थोरात, संतोष गवळी,प्रदीप बगाटे व इतर पदाधिकारी तसेच आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने होते.


