बाबासाहेब माळवदे
ग्रामीण प्रतिनिधी शहरटाकळी
शहरटाकळी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाणे 26मार्च 2023 रोजी घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये शेवगाव येथील प्रा प्रकाश पंढरीनाथ राजळे (शहरटाकळी )यांनी यश मिळवले असून अर्थशास्त्र विषयामध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.प्रा प्रकाश राजळे हे शेवगाव येथील कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहामध्ये उप्रध्यापक या पदावर अर्थशास्त्र विषयांचे काम बघत आहेत,या यशाबद्दल कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अँड डॉ शिवाजीराव काकडे, मा जि प सभापती सौ हर्षदाताई काकडे,युवा नेते पृथ्वीसिहं काकडे,तसेच संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा लक्ष्मण बिटाल यांनी अभिनंदन करून प्रा राजळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.