शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
परभणी : आषाढी एकादशी निमित्ताने नूतन कन्या प्रशालेत ज्ञानदिंडी चे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुख्मिनी आणि विविध संतांच्या वेशभूषेत असलेल्या विद्यार्थीनी आणि विठू माऊलीच्या गजराने, टाळ,मृदंग,पाऊली,फुगडी यांनी संपुर्ण आसमंत निनादात होता.याप्रसंगी ज्ञानदिंडीचे उद्घाटन रामराव गायकवाड, अशोक उफाडे यांच्या हस्ते झाले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता खराबे,उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल,सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर यांनी देखील विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन केले.सूत्रसंचालन तथा आभार कीर्ती राऊत यांनी मानले. ज्ञान दिंडीतील बाल वारकरीसाठी सुधाकर पवार आणि मोरे यांनी फळाराचे आयोजन केले होते . ज्ञानदिंडी च्या यशस्वीतेसाठी शशिकांत देशपांडे किशोर ढोके, नागेश देशमुख ,यशवंत कुलकर्णी, सुहास देऊळगावकर, सुनील मोगल,शंकर बोधनापोड, बाबासाहेब थोरे कैलास मलवडे,विनोद शिंदे,गोविंद शिंदे सुषमा दामा, वैशाली चव्हाण, सुरेखा आगळे,सीमा सूक्ते,विजया खडके, पूजा महाजन,उपेंद्र दिवाळकर,अनंत बोराडे, बालाजी देऊळगावकर, रामेश्वर काळे, भागू काळे, बेबी हेलसकर, वंदना वाव्हळ यांनी परिश्रम घेतले.


