कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर : बोडखा गावात सर्व जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे गुण्या गोविंदाने एकता बंधुता सामाजिक सलोख्यात एकत्र राहतात. आजपर्यंत शहरात कधीही धार्मिक कारणावरून वाद किंवा अनुचित प्रकार घडलेला नाही. सर्व जाती-धर्माचे लोक एकमेकांच्या धार्मिक उत्साहात मनापासून सहभागी होऊन सण साजरे करतात. ही परंपरा कायम ठेवत29/06/2023 रोजी येणारी बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने तमाम हिंदू समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर करून बोडखा गावातील जामा मशीद ट्रस्ट आणि बोडखा गावातील सर्वे मुस्लिम समाजाने न करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी करा. सर्व धर्माच्या समानतेची भावना मनात जागृत करून एक वेगळा आदर्शही मुस्लिम बांधवांनी समाजासमोर ठेवला आहे.