शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : ग्रामीण पोलिसांनी गोंवश तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा तडाखा सुरूच असून मागील ४ दिवसांत ३ मोठ्या कारवाई करत १२ गोंवशाना जिवदान दिले आहे तसेच लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने गोंतस्करी करणाऱ्यांचे सह्यायक पोलिस अधीक्षक तथा परीक्षावधीन प्रभारी ठाणेदार सुरज गुंजाळ यांच्या नावाने धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे. दि.२७ जुन २०२३ रोजी अकोट ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन बोर्डी नजीक नागापूर शेतशिवारात कत्तलीच्या उद्देशाने शेताजवळील ई क्लास जागेवर ६ गोंवश जातींचे बैल २ गोंवश जातींचे गोरे असे एकूण ८ गोंवशाना मोहम्मद इकबाल अब्दुल समद,सै.आसिफ सै.बिलाल राहणार अकोट यांच्या ताब्यातुन सुटका करण्यात आली.असून 2 लाख.65 हजार-रू चा मुद्देमाल जप्त करून विविध कलान्वे आरोपीता विरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई अकोट उपविभागातील पोलिस अधिकारी रितु खोखर मॅडम सह्या.परी.पोलीस अधिकारी प्रभारी ठाणेदार सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विष्णु बोडखे, उमेश सोळंके, दादाराव लिखार, शैलेश जाधव,गोपाल जाधव,हरीश सोनोने, नंदकिशोर नेमाडे, वासुदेव ठोसरे,नागे ,चालक मोतीराम गोंडचर ,सचिन कुलट यांनी केली.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)