बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड : रावणगाव ता दौंड येथे मुलांना अध्यात्म आणि भारतीय परंपरा संस्कार आणि वारकरी सांप्रदाय व उत्सव यांची माहिती मिळावी या उद्देशाने ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकाऱ्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंगलवस्ती रावणगाव यांनी ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर गावकरी ग्रामस्थ महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.चिमुकल्यांनी.वारकऱ्यांची वेशभूषा परीधान केली होती.ग्रामस्थांनी या चिमुकल्या वारकऱ्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब आटोळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पानसरे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संतोष आटोळे ,सदस्या निशा थोरात ,ज्योती अडसूळ, प्रवीण आटोळे, गजानन आटोळे ,अंबादास आटोळे ,अविनाश आटोळे ,भाऊसाहेब आटोळे महाराज व संतोष आटोळे यांनी आपल्या गायनातून भजन आणि गवळणीतून प्रबोधन केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक सुरेश राजगुरू व उपशिक्षिका वर्षा जाधव यांनी दिंडीचे नियोजन केले होते यावेळी अंगणवाडी सेविका संगीता आटोळे आणि सांगळे ताई उपस्थित होत्या.