मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस चांगलाच सक्रीय झालाय. पावसाने टॉप गिअर टाकत जोरदार बॅटिंग केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज बुधवारी 28 जून रोजी चांगलाच पाऊस झाला. आता हवामान खात्याने गुरुवार 29 जूनसाठी राज्याला पावसाचा इशारा दिलाय. राज्याला हवामान खात्याकडून गुरुवारी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नंदूरबार आणि जळगाव या 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सातारा, पुणे आणि नाशिक अशा एकूण 8 जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट आहे. तसेच वरील एकूण 12 जिल्ह्यांचा अपवाद वगळता उर्वरित महाराष्ट्राला म्हणजेच 24 जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट आहे.