सुधीर जाधव
जिल्हा प्रतिनिधी सातारा
सातारा : दि. 24 कारंडवाडी पासून जाणारा कण्हेर उजवा कालव्यामध्ये ट्रॉली उलटली. त्यामुळे पाण्यात बुडून चार महिला जागीच मृत्यू झाला, तर एक महिला व चालक वाचले आहेत. मात्र जखमी झालेल्या महिलेची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अरुणा शंकर साळुंखे (वय 58) लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय 60) सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय 65) व उल्का भरत माने (वय 55) अशी मृत महिलांची नावे आहेत. यामध्ये लता गुलाबराव माने या गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व महिला गुलाब रामचंद्र माने यांच्या शेतात काम करण्यासाठी सकाळी गेल्या होत्या. दुपारी जोरदार पाऊस झाल्यामुळे गुलाब माने या महिलांना ट्रॅक्टर ट्रॉलीतून घरी घेऊन येत असताना, पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता अरुंद आणि निसरडा रस्ता असल्याने कालवालगत पुलाजवळ आल्यानंतर वळणावर ट्रॉली कालव्यात उलटली, यामध्ये दोन महिला वाहत जाऊन, तर दोन महिला ट्राली खाली सापडून जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळतात सर्व कारंडवाडीत शोक काळा पसरली. मृत महिलांना पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने कालव्यामधून बाहेर काढून, जिल्हा शासकीय रुग्णालयात शव विछेदनासाठी दाखल करण्यात आले.


