संदीप घुमटकर
शहर प्रतिनिधी, चिखली
चिखली : शहरांमधील वार्ड क्रमांक१पंचायत समिती मागे माळीपुरा श्री महाकालीमंदिराच्या बाजूला असलेल्या नगरपालिकेच्या स्वच्छतागृहामध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच समोरील रोडवर नालीचे पाणी तसेच स्वच्छतागृहामधील पाण्याची डबके साचते त्यामुळे पायी येणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर असुविधा निर्माण होते तसेच या घाणीच्या पाण्यामधून पायी गेल्याने त्वचेचे गंभीर आजार होण्याचीशक्यता निर्माण होते. तरी नगर पालिका प्रशासनाने वेळोवेळी टँकरच्या पाण्याने स्वच्छता न करता कायमस्वरूपी स्वच्छतागृह कसे स्वच्छ राहील याकडे लक्ष द्यावे व रोडवरील पाणी साचू नये याकडेही लक्ष द्यावे.


