वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगांव तालुका शिवसेना प्रमुख विनोद काकडे यांच्या वाढदिवसा निमित्याने शिवसेने कडून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मोफत प्रस्ताव ( सेतु खर्च वगळुन ) शिवसेनेकडून तयार करुन देण्यात आले . शिवसेना माजी नगर सेविका मिना गायधने यांचे उपस्थितीत पात्र ज्येष्ठ नागरीकांसाठी श्रावण बाळ व विधवा महिला , परिपक्ता महिला , दिव्यांग दुर्धर आजारी व्यक्ति साठी शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेसाठी मोफत प्रस्ताव तयार करुन देण्यात आले आहे . यात श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी आहे- जाई पुरुषोत्तम बढे राळेगांव , मारोती महादेव डायरे राळेगांव , कमला जानबा किन्नाके रावेरी , लक्ष्मण महादेव डायरे रावेरी , पांडुरंग नारायण मोहदरे झाडगांव , अनुसया गुलाब काळसर्प राळेगांव , कवडाबाई दुर्गे राळेगांव , छबु पेन्द्राम राळेगांव , आशा देवतळे झाडगांव तर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी नलु किन्नाके रावेरी , प्रणिता रमेश झाडे झरगड , गिरजा नान्हे परिपक्ता झाडगांव इत्यादी लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार करुन देण्यात आले आहे . व प्रस्ताव मंजुर करुन घेण्यापर्यंत शिवसेनेचे सहकार्य राहील असा विश्वास शिवसेना कार्यकर्ते शंकर गायधने यांनी केला व मनोज राऊत , राजु किन्हेकार , लता भोयर , नंदु पोंगडे , सौरभ गेडाम इत्यादी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले . हरिदास कुबडे गुरुदेव विचार प्रचारक सामाजिक कार्यकर्ते , शरद केवटे , सरला वावधने प्रियदर्शनी ग्रामिण विकास संस्था राळेगांव यांनी सहकार्य केले .











