बांबूपासून ताटवे बनवण्यास मनाई
बुरड कारागिराचा आंदोलनाचा इशारा
विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर
चंद्रपुर/- चिमूर तालुक्यातील पिपरडा, पळसगाव, विहिरगाव, मांसल,गोंडमोहाडी,मदनापूर,
आडेगाव या परिसरात बांबु कामगार (बुरड) मोठ्या प्रमाणात आहेत.त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय हा सुप, टोपली, तट्टे बनविण्याचा असून याच व्यवसायातून त्याची उपजीविका चालते मात्र पळसगांव (बफ्फर झोन) येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आर एन ठेमस्कर यांच्या एकाधिकारशाही धोरणामुळे वअफलातून नियमामुळे या परिसरातील बांबू (बुरड) कामगार अडचणीत आले असून त्यामुळे या बुरड कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे.ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प निर्मितीच्या पूर्वीपासून चिमूर तालुक्यातील पळसगाव,पिपरडा, कआडेगाव विहिरगाव, मदनापूर गावातील नागरिकांचा अनेक पिड्यापासून मुख्य व्यवसाय हा बांबूपासून सूप,टोपल्या, ताटवे,डाले यांसह पारंपरिक कौशल्यातून विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवून विक्री करणे हा आहे या व्यवसायातुनच ते आपल्या परिवाराचा उदर निर्वाह करीत आहेत .सर्वोच्च न्यायालयाने बांबू हा वनौपज नसल्याचा निर्णय दिल्याने याचा उपयोग करून या परिसरातील ७५० बांबू कारागीर (कार्ड धारक) यांना वनविभागाने बांबू निस्तार हक्काने खरेदी करण्याचा परवाना दिला आहे त्यामुळे हे बांबू कारागीर (बुरड) पळसगाव येथील बांबू डेपोमधून बांबू खरेदी करून ताटवे,टोपली इत्यादी वस्तू बनवून विक्री करतात व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात मात्र पळसगाव बफ्फर झोन येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला तिलांजली देत बांबू पासून ताटवे बनवीत असाल तर डेपोतून निस्तार दराने बांबू मिळणार नाही व बनवून दिसले तर जप्त करण्यात येतील असा नवीन नियम लावून या विभागातील बुरड व्यावसायिकांना दम दिला आहे त्यामुळे या गावातील बांबू व्यावसायिक यांचा व्यवसाय पूर्ण ठप्प झाला आहे त्यामुळे या गावातील बुरड बांधवावर उपासमारीची पाळी आली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात गरीब बांबू कारागिरवर एकाधिकारशाही निर्णय लादणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास व ताटवे बनविण्यास परवानगी न दिल्यास परिवारासह पळसगाव बफ्फर वनक्षेत्र कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा इशारा बांबू माट्स युनियनचे अध्यक्ष रूपंचद बारसागडे, सचिव ज्ञानेश्वर ढोक,अतुल रमेश मेश्राम, महेश घोडमारे, रमेश पिसे व उत्तम ढोक यांनी पत्रकार परिषदेतुन दिला आहे
बांबू पासून ताटवे बनविण्यास मनाई का?
या परिसरातील बुरड कामगारांना बांबू पासून सूप,टोपली, ताटवे बनविता येतात ही कला त्यांना वडिलोपार्जित मिळाली आहे तर ग्राहकाकडून ताटव्याची मागणी जास्त होत असते त्यामुळे जो माल विकेल तो बनेल मात्र पळसगाव चे वन अधिकाऱ्यांनी ताटवे बनविण्यासाठी तोंडीं आदेशानुसार बंदी घातली आहे मात्र शासनाचा असा कुठलाही निर्णय नसल्याचे सांगण्यात येत आहे तरी या क्षेत्रात ताटवे बनविण्यास बंदी का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या बाबत वनपरिक्षेत्र अधिकारी आर एन ठेमस्कर यांच्याशी संपर्क साधला असता माहिती देण्यास टाळाटाळ केली











