राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आलापल्ली – गोंडवाना कृषी तंत्र विद्यालय अल्लापल्ली येथे प्रा.रामटेके यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
वृक्षाच्या महत्त्व सांगताना म्हणत होते
आपल्या पुराणांमध्ये वृक्षांना देव मानले आहे. खरोखरच वृक्ष हे देवासारखे आपल्याला मदत करतात. उन्हातानात थकलेल्या जीवाला वृक्ष शीतल छाया देतात. वृक्ष आपल्याला फळे देतात. ते आपल्याला इमारतीसाठी लाकूड देतात. त्यांच्या लाकडापासून आपण अनेक वस्तू बनवतो. इतकेच नव्हे तर ते स्वतःचा देह जाळतात आणि माणसासाठी चूल पेटवतात. आपल्याला औषध तयार करता येतात. शासनाच्या पर्यावरण संगोपन व बचाव उपक्रमानुसार कृषी विद्यालयातील प्रथम वर्षाचा विद्यार्थी विद्यालयात येऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम मुख्याध्यापक अश्विनी पेदापल्लीवार, शिक्षक सुनील रामटेके, लिपिक सुधाकर भोयर व तुषार , रोशन, शाहिद, साईनाथ, रमेश नम्रता, शुभांगी, जितेश्वरी, इत्यादी विद्यार्थ्यांचा हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आले.











