किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
जुने बस स्टॅण्ड येथे संत श्री सिदाजी महाराज संस्थांनच्या मालकीच्या जागेवर संस्थाननी पुजन करून नामफलकाचे अनावरण केले.
संस्थानच्या सदर जागेत व्यापारी संकुल उभारण्यात येत आहे.शहरातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला जर येथे व्यवसायासाठी दुकानाचे गाळे संस्थाननी ठरवून दिलेल्या काही अटी शर्तीवर भाडेतत्वावर पाहिजे असल्यास संस्थानच्या कार्यालयाशी संम्पर्क साधावा या स्वरूपाची सुचना या नामफलकावर लिहलेली आहे.
या कार्यक्रम साठी नगरसदस्य राजू उगले संस्थानचे अध्यक्ष रामदास खोकले सह महादेवराव गणेशे, नारायण फुलारी,तुकाराम ढोणे,राजु बायस,देवानंद शेवलकार,प्रा.विलास राऊत, शामराव गाडगे,रमेश काळपांडे,मोहन पाटील, प्रकाश बोचरे, शंकर गोतरकार,मुकुंदराव पुराड, सुरेश माहुलीकर,लक्ष्मण बारताशे, नितिन वानखडे,किशोर राखोंडे, देवानंद राखोंडे,पै.संजय यादव, गणेश गाडगे,पुंडलीक श्रीनाथ,पै.मंगेश गाडगे,प्रमोद कदम, राहुल कोथळकर,सचिन पाटील,विनोद वडतकार,रितेश सौंदळे आणी पातुर तालुका विकास मंचाचे ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांच्यासह इतर मान्यवर उपस्थीत होते.











