गोविंद खरात
शहर प्रतिनिधी,अंबड
अंबड : येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला . योग दिनाचे औचित्य साधून सामूहिक योग शिबिराचे प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सूर्यनमस्कार,पद्मासन ताडासन कपालभारती इत्यादी योगासनांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.या योग दिनानिमित्त योगगुरु वैभव खरात यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने यांची प्रात्यक्षिक करून दाखवली.यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नितीन निचळ, बोधलपुरी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मनोहर पटेकर , भागवत खरात, मुरली सहारे, विठ्ठल खरात, विलास जाधव, प्रशिक खंडारे, कमरुदिन शेख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.