भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव : आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाच्या दि. फ़्रेंड्स ऑफ द ड्रिस्पेड लिंग शेवगाव या सस्थेच्या शेवगाव येथील निर्मलाताई काकडे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाणे एम. एस्सी. इन कॉम्प्युटर अप्लिकेशन व बी. सी. ए. सायन्स या अभ्यासक्रमांस नुकतीच मान्यता दिली असून प्रवेश प्रकीयेला सुरवात झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुकळे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली. काकडे शिक्षण समुहाचे अध्यक्ष अँड. डॉ. शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे व युवा नेते पृथ्वीसिहं भैया काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना उपयुकत असे अभ्यासक्रम व कोर्सेस शेवगाव सारख्या ग्रामीण भागात सुरु केले आहेत. त्यामुळे भविष्याची पावले अचूक ओळखून या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करीअर करण्याच्या संधी प्राप्त करून दिल्या आहेत. महाविद्यालयाने सुरु केलेल्या या दोन्ही अभ्यासक्रमासाठी पात्रतेनुसार प्रवेश प्रकिया सुरु असून विदयार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधवा असे आवाहन सस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. लक्ष्मणराव बिटाळ, प्राचार्य डॉ. दुकळे यांनी केले आहे.