दिपक मसुरकर
तालुका प्रतिनिधी रिसोड
रिसोड : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्नित कृषी महाविद्यालय रिसोड येथे दिनांक 21 जून 2023 ला संचालक विद्यार्थीकल्याणडॉ.प.दे.कृ.वि अकोला यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजना कृषि महाविद्यालय रिसोड च्या पुढाकारातून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात सुप्रसिद्ध योग गुरु श्री गणेश विठ्ठलराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी एका विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या योग शिबिराचे उद्घघाटन कृषी महाविद्यालयाचे तांत्रिक समन्वयक तथा कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम श्री राजेश डवरे यांचे शुभ हस्ते करण्यात आले तर योग शिबिराचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष अप्तुरकर यांनी भूषविले. या शिबिरात योग गुरु श्री गणेशराव देशमुख यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाश्वत शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी विविध योगासनाचे प्रत्यक्ष कृतीतून धडे दिले व विविध योगासने विद्यार्थ्याकडून करून घेतली .या शिबिराच्या शेवटी श्री गणेशराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना युवा पिढी मधील शारीरिक स्वास्थ्याचे महत्त्व अधोरेखांकित करताना योगासनाचा नियमित अंगीकार करण्याचे आव्हान केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे तांत्रिक समन्वयक श्री राजेश डवरे व प्राचार्य डॉ.आशिष आपतुरकर यांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल आपले विचार व्यक्त केले. या योग शिबिराचे आयोजनासाठी दिपक मसुरकर सहा. प्रा. कृषि विस्तार शिक्षण विभाग तथा कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना कृषि महाविद्यालय रिसोड आणि एल .बी.काळे सहा.प्रा.शारीरीक शिक्षण विभाग तथा क्रीडा अधिकारी यांनी विशेष समन्वयन केले आणि या शिबिरात महाविद्यालयातील संपूर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनीसह प्रा. एस. जे जाधव , प्रा. कु.जि. आर.गोहाडे, प्रा. कु.वानखेडे, विकास जोगदंड, संजयराव देशमुख व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सक्रिय सहभाग नोंदवून हे योग शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.