मधुकर केदार
शहर प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते श्री.ऋषिकेश प्रताप ढाकणे यांची संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना बोधेगाव ता.शेवगाव चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली या निवडीबद्दल कारखान्याचे संस्थापक माजी केंद्रिय मंत्री बबनराव ढाकणे साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अँड.प्रताप ढाकणे यांनी सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना प्रताप ढाकणे म्हणाले की, सर्व नूतन संचालक मंडळाने येणाऱ्या काळात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न समजावून त्यासाठीचे धोरण अवलंबून सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा.


