अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मालेगांव तालुक्यात जास्तीत जास्त शेती ही जंगलाला लागून आहे तर त्यामुळे वन्यप्राण्यांमुळे शेतातील पिकांचे आतोणात नुकसान होते आहे. कारण जंगला मध्ये दीवसे न दिवस हरीण,रोही, नीलगाय, रानडुकरे ह्यांची संख्या मर्यादा पेक्षा जास्त वाढत आहे. त्या करीता शासनाने डॉ श्यााप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजना राबविण्यात येत आहे.सदर योजने अंतर्गत वाघ्र प्रकल्पच्या बफर क्षेत्रात तसेच अभयरण्य राष्ट्रिय उद्याण्याच्या सीमेपासून 5 किलोमीटर वरील संवेदनशील गावामध्ये वन्यप्राण्यांच्या शेती पिकाचे नुकसान टाळन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सामूहिक जाळीचे कुंपण उभारण्यास मंजूरी देण्यात आली आहे. जेथे कमीत कमी 10 शेतकरी वर्गाची सामूहिक कुंपण तयार करण्यासाठी समिति तयार करण्यात आली असेल अशा प्रकारे ती समिति लाभार्थी म्हणून पात्र ठरते.याला अनुसरून मागच्या वर्षी वनविभाग मेडशी यांच्या माध्यमातून मेडशी येथील वन परिक्षेत्र कार्यालयामध्ये परिसरातील सर्व जंगला लागत शेती असलेले शेतकरी यांची सभा घेत त्यांना सदर योजनेची परिपूर्ण माहिती देत अभिप्राय घेतले. व सदर योजना ही कशी आहे व ह्या मध्ये शासनाकडून अनुदान किती व कश्या स्वरूपात देण्यात येईल ह्याची सुध्दा माहिती देऊन शेतकरी वर्गाकडून मागणी अर्ज पण मागविण्यात आले. बरेच शेतकरी वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळूले आहेत. त्यामुळे बहुसंख्येने शेतकरी सदर योज नेचा लाभ घेण्याची तयारी दर्शवली. मात्र माशी शिंकली कुठ अन् ह्या योजनेचा लाभ तालुक्यांतील जंगला लागत क्षेत्र असलेल्या शेतकरी वर्गाला अद्याप ही मिळाला नाही. शासन दरबारी योजना असून मेडशी मधील शेतकरी वर्गापर्यन्त का पोहचली नाही ह्याच कोड अद्याप ही गुलदस्त्यात आहे.
प्रतिक्रिया – माझे शेत जंगला लगत आहे. दरवर्षी वन्य प्राण्यांच्यामुळे पिकाचे आतोनात नुकसान होत आहे मी सदर योजने अंतर्गत तार कुंपण घेण्यासाठी गतवर्षी अर्ज केला आहे परंतू अद्याप ही मला लाभ मिळाला नाही – राजदार पठाण(शेतकरी मेडशी)