हिरा आसलकर
शहर प्रतिनिधी मलकापूर
मलकापूर. स्मशानभूमी मध्ये वडील व भावांच्या आत्मशांतीसाठी केला अघोरी प्रकार…
आशिष गोठी सह तीन मांत्रिकांवर शांतता भंग केल्याचे गुन्हे दाखल…
मलकापूर.मृतक वडील व भावाच्या आत्मशांतीसाठी एकाने चक्क स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात तीन मांत्रिकाच्या उपस्थितीत दिव्यांची आरास मांडल्याने शहरातील मातामहाकाली परिसर अक्षरशः हादरला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.
यासंदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की ,शहरातील माता महाकाली परिसरातील रहिवाशी आशिष गोठी या युवकाच्या वडिलांचे व भावाचे निधन काही महिन्यापूर्वी झाले असून त्यांची आत्मशांती झाली नाही.म्हणून त्याच्या घरात शांतता भंग पावली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून आशीष गोठी याने शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास तीन मांत्रिक कै . लक्ष्मण हिरु चव्हाण स्मशानभूमीत पाचारण केले.त्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात चक्क दिव्यांची आरास मांडली व मंत्रोच्चार करून प्रेत जागृतीचा अघोरी प्रकार केला.या घटनेची वाती वायासारखी मातामहाकाली परिसरात पसरली त्यामुळे नागरिकांनी स्मशानभूमी परिसरात एकच गर्दी केली.या प्रकाराने संपूर्ण परिसर चांगलाच हादरला.तब्बल दोन तास मांत्रिकांचे प्रेतांचे संभाषण सुरु होते.असंख्य नागरिकांनी हा प्रकार बघीतला मात्र भितीपोटी कुणी पुढे जाण्यासाठी धजावलं नाही.दरम्यान या घटनेची माहिती नागरिकांनी कळवताच पोलीस उपनिरीक्षक एस.जी.ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी आशिष गोठी व त्या तीन मांत्रिकांना ताब्यात घेतल्यानंतर हादरलेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला . दरम्यान सार्वजनिक शांतता भंग केल्याने शहरपोलीसांनी आशिष गोठी याच्याविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे . तर त्या तीन मांत्रिकांवर सार्वजनिक शांतता भंग केल्याने शहरपोलीसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे . या प्रकाराने आशिष गोठी याच्याविरुद्ध कलम १८८ अन्वये शहरात देखील खळबळ उडाली असून तपास गुन्हा दाखल केला आहे . तर त्या तीन मांत्रिकांवर पोलिस उपनिरीक्षक एस.जी.ठाकरे करित आहेत .
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)