पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
सर्व्हिस रोडबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना सूचना
कन्नड : टापरगाव ता. कन्नड येथे नव्याने प्रस्तावित असलेल्या जिल्हा परिषद शाळेची पाहणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. यावेळी गट नं २० मधील जागा योग्य असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष व सीईओ यांना कळविण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे, राष्ट्रीय महामार्गचे महेश पाटील, सरपंच अशोक दाबके, उपतालुकाप्रमुख शिवाजी थेटे, माजी सरपंच अनिल जैस्वाल, शाखाप्रमुख दिलीप मोहिते, रामदास जंगले, उदय मोहिते, मधुकर मोहिते, सतिष मोहिते, उदय सातदिवे, कल्याण मोहिते, ज्ञानेश्वर घुणावत, दीनकर राशिनकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.