राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
सिरोंचा – आज दिनांक 11/07/2021 रोजी उप पोलीस स्टेशन झिंगानूर मधील अति दुर्गम वडदेली गावात पोलीस उपनिरीक्षक पाथरकर आणि पोलीस दलामार्फत यांनी भेट देवून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देवून, नक्षलवाद्यांच्या बंद बाबत पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात आले, तसेच नक्षल विरोधी वाटप केले.
त्यानंतर गावातील लहान मुले, मुली, वृद्ध महिला पुरुष याना लिंबू चमचा खेळ खेळण्यात येवून प्रतेक गटात दोन याप्रमाणे पाहिले क्रमांक आणि द्वितीय क्रमांक आलेल्या एकूण सहा खेळाडूना प्रोत्साहन पर नगदि बक्षीस देवून गौरवण्यात आले. तसेच गावातील लहान मुलाना मिठाई वाटप करून गावातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या. आणि महिला पोलीस अमलदाराकडुन गावातील महिलांच्या समस्या समजून घेण्यात आल्या. सदर ग्राम भेटी मुळे गावातील लोकांनी समाधान व्यक्त करून उत्साहाने भाग घेतला.