सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर तालुक्यातील
श्री क्षेत्र सचिदानंद आश्रम सावत्रा ह्या गावी संतराम जी महाराज नावांचे महान संत होऊन गेले.त्यांची समाधी सावत्रा ह्या गावी आहे. या ठिकाणी पुर्वी चे जुने मंदिर सध्या जिर्ण ह्या अवस्थेत झालेले.मंदीर सन २०१४प पु श्री १००८स्वामी अमोलानंद महाराज(अखंड चैतन्य महाराज) पाहुन त्या ठिकाणी अंगमण केले.
प.पु.श्री.अमोलानंद महाराज यांच्या जिवन चरित्र माहिती वयाच्या अकराव्या वर्षीच गॄह त्याग करून घर सोडून त्यांनी आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी गुरूच्या शोधात निघाले.नंतर त्यांना ब्रम्हचारी संत रामप्रसाद शास्त्री महाराज यांचे सान्निध्यामध्ये शालेय शिक्षण घेत त्यांनी धार्मिक शिक्षण ही घेत असतांना वारकरी संत साहित्य संत चारित्र्य वेदांत ग्रंथ इ . ग्रंथाचा अभ्यास केला . नंतर
त्यांना संन्याशी गुरू चे सानिध्य लाभले श्री १००८स्वामी विश्वांनंद गिरी महाराज त्यांच्या सानिध्यात वैराग्य प्राप्ती झाली असून त्यांच्या कडून ब्राह्मचरी दिक्षा घेतली घेतली.वॄदांवन क्षेत्रामध्ये श्रीमदभागवत कथेचे अध्ययन केले.किर्तन प्रवचन श्रीरामकथा श्रीमद्भगवद्गीता इ.अध्यामिक क्षेत्रामध्ये वावरत असतांना अणेक गावोगावी संबंध वाढत गेले.सावत्रा गावांमध्ये आले असता त्यांना गावातील लोकांनी सन २०१४ ला श्री संत रामजी महाराज मंदिराबाबत माहिती दिली.
त्यांना थांबायला विनंती केली व त्यांनी गावातील मंडळी च्या शब्दाला मान देऊन तिथेच स्थानापंन्न झाले.व त्यांनी श्री संत रामजी महाराज यांच्या मंदीराचे जिर्ण झालेले काम पाडुन नवीन बांधकाम केल्यामुळे . परिसरातील भक्त येऊ लागल्याने भक्त जोडत गेले ह्या परिसरातील रायपूर सोनार गव्हाण सुळा कळबेंश्वर नायगाव शेंदला हिवरा आश्रम ई परिसरातील भक्त वाढत गेले.मराठवाडा विदर्भ प्रांतातील भक्त मंडळी जोडण्याचे काम केल्यामुळे ह्या ठिकाणी श्री संत रामजी महाराज मंदीराचे रूपांतर हळूहळू आश्रम झाले.व नंतर ह्याचे नामकरण श्री महाराजांनी ह्या ठिकाणाला सचिदानंद आश्रम असे नाव दिले.श्री १००८गुरूवर्य स्वामी कृष्ण चैतन्य पुरी महाराज यांच्या कडू संन्यास दीक्षा घेतली म्हणून त्यांचे नाव अखंड चैतन्य पुरी असे झाले.व त्यांनी आश्रमाच्या परिसरात शेकडो अणेक प्रकारच्या वॄक्षची लागवड केली आहे.वड पिंपळ औदुंबर बेल अंबा चिकु खिर्णी आवळा इ.प्रकारचे वॄक्ष लावून पर्यावरण व आश्रम सुशोभीकरण करण्यात भर दिला आहे.आश्रमामध्ये गुरू पौर्णिमा श्रीकृष्ण अष्टमी श्रीराम नवमी श्री संत रामजी महाराज पुण्यतिथी असे अनेक उत्सव संपन्न होतात
अखंड चैतन्य पुरी महाराज यांणी पुढे वॄध्द आश्रम अनाथाश्रम स्थापन करण्याची संकल्पना त्यांनी केली आहे











