मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
हिवरखेड : महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष स्मृतिशेष पि. एल. सिरसाट यांची जयंती हिवरखेड येथील पत्रकार भवनात महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ तेल्हारा तालुका व हिवरखेड शाखा यांच्या संयुक्त विद्येमाने मोठया उत्सहात साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष हिवरखेड शहराध्यक्ष गजानन राठोड तर प्रमुख अतिथी तेल्हारा तालुकाध्यक्ष सिद्धार्थ गवारगुरू, तालुका सचिव सुनील तायडे, ता. संघटक प्रा. विकास दामोदर, सह संघटक सागर खराटे,उपाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम सुशीर, प्रेमसागर वानखडे सदस्य विनोद रोजत्कार तसेच हिवरखेड प्रेस क्लब कार्याध्यक्ष प्राचार्य संतोष राऊत, हिवरखेडचे पोलीस पाटील प्रकाश गावंडे होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पि. एल. सिरसाट यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, कु. दीपिका मुराई व कु. दिक्षा गवई यांची महिला उपाध्यक्षा म्हणून निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.कार्यक्रमानंतर हिवरखेड येथील पत्रकार भवनाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले, कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सागर पुंडकर यांनी तर आभार प्रदर्शन गजानन राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता हिवरखेड येथील कार्यकारिणीतील सागर सुरळकर, अ. साकिब, अ. आशिफ, राहुल इंगोले, पवन नेरकर, मुद्दस्सीर खान, मुमताज खान तथा सौ. उषाताई राठोड यांनी अथक परिश्रम घेतले,