वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव : गावाच्या बाजूला असलेल्या कुराणमध्ये धनगर समाज खूप मोठया प्रमाणात आहे. आपला उदरनिर्वाह करण्याकरिता जंगलात मेंढया चारत असताना काल दि.07/07/2021 ला दुपारी चार वाजता चा दरम्यान अचानक विज कोसळली त्यात साहेबराव शिंदे यांच्या 12 मेंढया जागीच ठार झाल्यात, तसेच बाजूला शेतात काम करीत असलेल्या आपल्या परिवारा सोबत वरुड येथील महिला अनिता कुबडे जखमी झाली. तातडीने तिला यवतमाळ शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. पहिल्यांदाच हवालदिल असलेला शेतकरी शेती काम करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीमुळे दुःखाच्या सावटात सापडलेला आहे. तालुक्यात धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणात असून तो आपल्या मेंढी पालन करून स्वतःचा उदरनिर्वाह चालवतो आणि त्यांचा चालू असलेल्या उदरनिर्वाह त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आल्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांवर अतिप्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संकटाचे सावट असताना अचानकपणे आलेल्या नैसर्गिक संकटामुळे आता शेतकरी हवालदिल झालेला आहे. एकीकडे पावसाने दडी मारली असून दुसरीकडे अचानक पण येणाऱ्या पावसाने सुद्धा आता दुहेरी संकट निर्माण केल आहे.शासनाने तातडीने भटकंती करणाऱ्या समाजाला मदत करावी.
अनिता कुबळे
दिवसागणिक होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला धनगर समाज बळी पडत आहे त्यामुळे धनगर समाजाबद्दल आता शासनाने विविध प्रकारच्या असणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचवल्या पाहिजे विशेष करून अचानकपणे मरण पावलेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या विम्याची सुद्धा तरतूद शासनाने करावी अशी आम्ही मागणी करीत आहोत.
पवन थोटे
अधिकारी-कर्मचारी धनगर समाज संघटना ,यवतमाळ.