अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव तालुक्यातील जुन महिन्याच्या सुरुवातीला कमी जास्त पाऊस पडला तर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. तर काही शेतकरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पेरणीनंतर केली. तर काही शेतकऱ्यानां दुबारा पेरणी करावी लागली. पण दमदार पाऊल नसल्याने शेतकरी यांनी दुबारा पेरणी केली. त्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक काही निघाले तर काही निघाले नाही. अशातच पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. पाऊसच आभाळात गायब झाल्याने बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहे. उगवणशक्तीलाच पाणी न मिळाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. तर बरडाचे,शेतजमिनी मधील सोयाबीन पिक सुकत चालले आहे. मालेगाव तालुक्यातील मेडशी, मुंगळा, डोगंरकिन्ह, राजाकिन्ही, मालेगाव या भागात सोयाबीन पिक जास्त प्रमाणात आहे. शेतात हिरवे पिक दिसत असले तरी पिकाची वाढ खुंटते त्यामुळे सोयाबीन पिकाची उंचीची क्षमताना कमी दिसत आहे. पाऊस पडण्याची वाट मागील काही दिवसापासून शेतकरी पाहत आहे.