सय्यद रहिम रजा
ग्रामीण प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड : आपल्या लेखणीच्या बळावर शोषित वंचित घटकांच्या समस्यांना वाचा फोडणे भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडून लोकशाहीला बळकट करण्याचे कार्य हे पत्रकार बांधव करीत असतात. दर्पण पत्रकार संघटनेचे सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष पदी डॉ.आयुब खान पठाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. भाविक भाऊ भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनुभव शेखावत, तालुका उपाध्यक्ष प्रमोद , राठोड विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष निकेश राठोड, विद्यार्थी संघटना तालुका सचिव विजय अवधूत , तालुका उपाध्यक्ष देवानंद बर्डे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.