अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
घरची परिस्थिती तशी बेताचीच त्यात वडील अकोला महानगर पालिका मध्ये रोजंदारी वर वाहन चालक होते. अभिनयाचे कोणतेही बाळ कडू घरातून मिळाले नसले तरी लहानपणा पासून असलेली अभिनयाची आवड व नृत्य करण्यात जन्माता असलेली दैवी देणगी च्या जोरावर तिने थेट मराठी सिनेमा सृष्टी मध्ये नटिका चे काम मिळवले. लहानपणी टीव्ही वर वेगवेगळे कार्यक्रम पाहून घरातच अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या पुनम केकन ने गेली काही वर्षे अकोला तसेच बाहेर झालेल्या विविध प्रकारच्या स्पर्धा मध्ये नुत्याच्या कलेमध्ये आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले.लावणी नृत्य मध्ये तिने प्रेक्षकाच्या मना वर भुरळ घातली. अकोला लोकमत सखी मंचच्या माध्यमातून अकोला,अमरावती, जळगांव आणि इतर ही ठिकाणी उत्कृष लावणी प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावले.तर ती येथेच थांबली नाही आकाश बिजवे यांच्या कडून लावणी चे प्रशिक्षण घेतले.तर प्रकाश मेश्राम यांच्या कडून नृत्य शिकत झेनिथ समूहाच्या माध्यमातून मिठील कळंबे यांच्या सहकार्यामुळे राज्याबाहेर ही तिने दिल्ली,पंजाब, ओडिसा येथे आयोजित नृत्य स्पधेत लावणी सादर करत आपली व महाराष्ट्रीयन लावणी ची एक वेगळी च छाप पाडली.या दरम्यान आलेले अनेक चढ उतार पार करत जिद्द, मेहनत, चिकाटी च्या बळावर तिने थेट मराठी सिनेमा सृष्टी मध्ये काम मिळवले.पूनम चा जन्म हा 24 फेब्रुवारी 1994 ला अकोला येथे झाला असला तरी ती मूळची राजंदा या छोट्या गावाची पण अकोला मध्ये तिचे बालपण गेले. लहान पण पासून च तिला अभिनयाची खूप जास्त आवड होती,पण घरच्या परिस्थितीमुळे अभिनयाचे विशेष प्रशिक्षण घेता आले नाही. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेली पुनम ही ढोल वाजवणे, नृत्य, अभिनय, शालेय कार्यक्रम असो किंवा सार्वजनिक ठिकाणी नृत्य स्पर्धा असो ती पुढेच असायची. महाविद्यालयीन जीवनात तिला आपली नृत्य कला सदरी करण्याची संधी मिळाली व मिळालेल्या प्रत्येक संधिच तिने सोन केलं.अमरावती विद्यापीठ च्या आयोजित नृत्य स्पर्धेमध्ये तिने सलग दोन वर्षे कलर कोट मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.त्यानंतर इंदोर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय फॉल्क डान्स स्पर्धेत सुद्धा प्रथम क्रमांक मिळविला.तीच्या आयुष्यातील सर्वात चांगला पुरस्कार तिच्या मते लोकमत युवा नेक्स्ट चा मिळालेले प्रथम पारितोषिक आहे.कारण या स्पर्ध मध्ये खूप मोठे मोठे व अनुभवी स्पर्धक सहभागी झाले होते.त्यात तिने आपल्या नृत्याच्या बळावर त्यांना मात देत क्रमांक पटकावला होता.कला शाखेत पदवी प्राप्त झाल्यानंतर तिने डॅड चिअर्स या सिनेमा मध्ये एका गाण्यापुरते काम मिळवले.त्या गाण्यातील तिच्या नृत्याने प्रेक्षकांना भावली त्यामुळे तिला त्या नंतर संशय या चित्रपट मध्ये मुख्य अभिनेत्री च्या रूपाने आपणास पहायला मिळणार आहे.ति येणाऱ्या तिच्या चित्रपटाविषयी खूप उत्सुक आहे.तिला तिच्या स्वप्नापर्यंत पोहचण्यात तीच्या घरचे आई बाबा व आजीचा पाठिंबा मिळाला आणि पल्लवी खरात, अंजली भक्ते या मैत्रिणी चे पण विशेष सहकार्य लाभलं ज्यामुळे ती तीच्या स्वप्नापर्यन्त पोहचली असे तिचे म्हणणे आहे.