अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
कंचनपूर येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा अंतर्गत लघुउद्योग करिता महिला बचत गटांची कार्यशाळा घेण्यात आली .
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उमेद अभियान जिल्हा महाव्यवस्थापक गजानन महल्ले तालुका समन्वयक संदेश मस्के गट समूह आरती उकळकर पोखरा गट समन्वयक आरती पराळे हे उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील सरपंच सिद्धार्थ शिरसाट होते. तर ग्रामसेवक अरविंद शिंदे गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रल्हाद चौरे राजेश शेळके जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शेगोकार गुरुजी महेश चौरे ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण चोरे कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांचे पूजन करून करण्यात आली तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकन्या शिरसाठ यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन शिवशंकर डिक्कर उपसरपंच तसेच भाजपा शेतकरी आघाडी सोशल मीडिया प्रमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन गावातील सी आर पी ताई ज्योती ताई डिक्कर यांनी केले तसेच गावातील 14 गटाचे अध्यक्ष सचिव या हजर होते तसेच या निमित्त वृक्षारोपण सुद्धा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यामार्फत औषध गोळ्या सुद्धा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले आणि लघु उद्योगा बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.