औरंगाबाद : दै. भास्कर समूहाचे चेअरमन स्व. रमेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मरणार्थ बुधवारी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात विविध केंद्रांवर सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत ११२० बॅगा रक्त संकलित करण्यात आले. रमेशजींच्या सेवाकार्याचा वारसा पुढे चालू राहावा म्हणून रमेश अँड शारदा फाउंडेशनच्या वतीने या दिवशी देशभर २२० शहरांत अशा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. विविध शहरांत आयोजित या शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. औरंगाबादेत ६ केंद्रांवर ४२८ बॅगा, नाशिकमध्ये ४ केंद्रांवर ६०, जळगावमध्ये ३३, भुसावळमध्ये ५७, धुळे येथे १७, सोलापुरात ११०, बार्शी येथे ५५, उस्मानाबादेत ५४, बीड येथे २३ तर जालना येथे १८ बॅगा, तर २६५ बॅगा रक्त संकलित करण्यात आले. हे रक्त स्थानिक सरकारी रक्तपेढ्यांना दान केले जाणार आहे.