शकील खान
शहर प्रतिनिधी मूर्तिजापूर
मूर्तिजापूर :- महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन अवघ्या दोन दिवसाचे घेण्यात आलेले आहे. या मधे पहिल्या दिवशीच ओबीसी व मराठा समाजा प्रश्नाबाबत तालीका अध्यक्षांना जाब विचारतांना भााजपाचे १२ आमदारावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आलेली आहे. हे निलंबन लोकशाहीला काळीमा फासणारी आहे ओबीसी आरक्षणात सरकारचे अपयश आले असल्यामुळे या १२ आमदारांवर खोटे आरोप लावुन निलंबन केले आहे. जनतेच्या समस्या सोडविण्याकरीता महाराष्ट्रातील जनतेने या लोकप्रतिनिधींना विधीमंडळात पाठवीले आहेत. परंतु लोकप्रतिनीधीचा पर्यायांनी जनतेचा आवाज दाबण्याचे काम या महाविकास आघाडी सरकार करीत आहे.
या १२ आमदार मधे मुर्तिजापूर मतदार संघातील मा.आमदार श्री हरिषभाऊ पिंपळे साहेब यांचा सुध्दा समावेश आहे. आमदार साहेबांनी मुर्तिजापूर मतदार संघातील ओबीसी व मराठा आरक्षणा संदर्भात न्याय मिळण्याकरीता एक लोकप्रतिनीधी या नात्याने कलेले एक मोठे कार्य आहे. पंरतु त्यांच्यावर सोबतच बाकी सर्व आमदारावर खोटे आरोप करुन लोकशाहीचा खुन करण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे.
अध्यक्षांच्या दालनात कोणत्याही प्रकारची शिवीगाळ झालेली नसुन उलट शिवसेनेच्या काही आमदांरानीच गदारोळ केलेला आहे. अशा या महाभकास आघाडी तालीबानी सरकारचा भारतीय जनता पार्टी मुर्तिजापूर शहर व ग्रामीण तसेच भारतीय जनता युवा मोर्चा मुर्तिजापूर शहर व तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.
या निलंबीत केलेल्या १२ आमदांराचे निलंबन महाविकास आघाडी सरकारने त्वरीत मागे घ्यावे अन्यथा भारतीय जनता पार्टी मुर्तिजापूर शहर व तालुक्याच्या वतीने भाजपा प्रदेश कार्यालच्या निर्देषानुसार पुढील आंदोलन