पत्रकार बंधूंना हेल्मेट आणि इतर साहित्याचे वितरण
अविनाश पोहरे / चिफ ब्युरो, अकोला
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना पातूर तालुक्याच्या वतीने अकोला रोड पातूर येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय सभागृहामध्ये रविवारी कोरोना काळामध्ये जिवाची पर्वा न करता उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बंधु यांचा प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह आणि कोरोना पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अंकुश वाकडे यवतमाळ तर मधुकर बावणे संपादक सा अभय राज्य, संतोषजी खूमकर उपविभागीय अधिकारी विद्युत वितरण पातुर, हरीश गवळी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पातुर, तुळसाबाई कावल विद्यालय चे माजी प्राचार्य विजयसिंह गहिलोत, शाहबाबू विद्यालयाचे ऍड. रफिकोद्दीन सौदागर, पत्रकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पांडव, विभागीय प्रमुख सिद्धार्थ तायडे, जिल्हा अध्यक्ष गणेश सुरजुसे, उदय नवाडे नवराष्ट्र ब्युरो चीप, जिल्हा संघटक स्वाती सुरजुसे, ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे, पातुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका जयश्री बोळे, जिल्हा सचिव पवन वानखडे, नयन मुंढे जिल्हाध्यक्ष अमरावती, ज्येष्ठ पत्रकार शंकरराव नाभरे, राजारामजी देवकर, अब्दुल कदीरभाऊ, प्रा. सि. पि.शेकूवाले, पातुर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले, अमित कंदहार शहराध्यक्ष अकोला, अनिरुद्ध उगले, सागर डोंगरे, सोहेल खान ,भोजू बायस प्रा. विलास राऊत ,छोटू भाऊ उर्फ सूर्यकांत जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पातुर पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष देवानंद गहिले यांनी करताना पातुर तालुक्यांमध्ये तसेच इतरत्र जीवाची परवा न करता कोरोना ला हद्दपार करण्याकरता ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या पाठीशी पत्रकार संघटना उभी असून शासनाला याकरता वेळोवेळी मदत केली आहे आणि यापुढे सुद्धा ही मदत सुरूच ठेवू
कोरोनाला हद्दपार करण्याकरता पत्रकार संघटना शासनाच्या सोबत राहील असे त्यांनी प्रास्ताविकामधून व्यक्त केले.
यावेळी ठाकूर शिवकुमार सिंह बायस, डॉ. उर्मिला केवट नागपूर, उपविभागीय अधिकारी संतोषजी खुमकर, ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे, आरोग्य सेविका जयश्री बोळे, एडवोकेट श्रीकांत ताले, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली निकम, सय्यद अहेफाजोद्दीन, राजु उगले, विठ्ठल कटारे मुख्य अभियंता विद्युत केंद्र पारस, निलेश देव बांधकाम अधिकारी अकोला, श्रीधर लाड पत्रकार आलेगाव, यांच्यासह पत्रकार बंधु अधिकारी-कर्मचारी कोव्हीड योद्धा यांचा सन्मान प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह, संघटनेची डायरी, दिनदर्शिका देऊन करण्यात आला आहे तसेच कार्यक्रमांमध्ये पातुर तालुक्यातील पत्रकार बांधवांना हेल्मेट चे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.प्रसंगी संतोष खुमकर यांनी विचार व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषण प्रा.अंकुश वाकडे यांनी करताना पत्रकारांची स्वतःची ओळख असावी पत्रकारांची भाषाशैली कशी असावी याबद्दल त्यांनी विस्तृत मार्गदर्शन करताना पत्रकार संघटना काळाची गरज असून ती मजबूत राहावी आणि समाजाभिमुख राहावी असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ करुणाताई गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन पातूर तालुका पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष संजय गोतरकर यांनी केले.या कार्यक्रमाला रामहरी पल्हाड, प्रा.साजिद सर, मोहम्मद फरहान अमीन, रक्षण देशमुख, अविनाश पोहरे, सुधाकर राऊत, विजय सरदार, योगेश नागोलकर, सतीश कांबळे, दिलीप गिर्हे, अब्दुल् जफर, शोएब खान, रमेश निलखन ,प्रशांत गवई ,चिंदाजी गुळदे, प्रेमचंद शर्मा, मनोहर सोनोने, गजानन येनकर, चेतन भुजबळ, राहुल सोनूणे ,शेख अन्सार, छगन कराळे, रवी गोतरकर, अभिजीत ताजणे , जुबेर शेख, तोकिर अहेमद, सय्यद हसन बाबू, अमोल करवते, पवन तांबे, राहुल धाडसे, बाबुराव सावंत, माणिक ठाकरे, शाहीद इक्बाल ,इरफान शेख, सय्यद अहमद, सुनील बग्गन, अमोल सोनोणे, छगन बोदडे यांच्यासह पातुर तालुक्यातील इतर पत्रकार बांधवांची तसेच भारतीताई गाडगे ,प्रिया तेलगोटे ,सुप्रिया इंगळे ,ज्योतीताई दाभाडे, मायावती शिरसाट, सौ. दिपमालाताई गहिले, गजानन महाराज वानखडे ,अनिक सौदागर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी कुंदन इंगळे, डॉ. ओम प्रकाश धर्माळ ,अनिल ठाकरे, तलाठी डाबेराव गोंधळवाडी उत्तमराव दाभाडे आदि सन्मान्यनीय मान्यवरांची उपस्थिती होती सदरचा कार्यक्रम डिस्टन्स चे पालन करून मास्क व सॅनिटायझर चा उपयोग करून कोरोना संसर्गाचे नियम पाळून करण्यात आला आहे.