अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर – दि : 24 /11/2022 रोजी शिर्ला येथे उमेद अभियान साई महिला ग्राम संघ बोर्डाचे उदघाट्न जिल्हाधिकारी मा. निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमा मध्ये सहभागी DRD चे अधिकारी DM मा.काकड सर, गजानन महल्ले, शिर्ला क्लस्टर च्या अध्यक्षा तसेच ग्रामपंचायत उपसरपंच सौ. कल्पना खरडे, ग्रामपंचायत सदस्य रेखा गवई, ग्रा.सचिव स्वाती इंगळे,वर्धिनी उमा महल्ले, ICRP मैना उपर्वट तसेच ग्रामसंघाच्या सर्व सदस्य व माहिला उपस्थित होत्या.यावेळी पंचायत समिती उमेदचे कर्मचारी शेख शाहरुख, शेख रीजवान,राम डुकरे,नखाते आदींची उपस्थिती होती.


