अकाेला : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाकरता उर्वरीत अडीच वर्षांसाठी नविडणूक साेमवारी हाेत असून, सत्ताधारी व विराेधक अशा दाेन्ही बाजूने वजियासाठी फिल्डींग लावण्यात आली आहे. सदस्य संख्या लक्षात घेता तूर्तास तरी सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीला निवडणूक जिंकणे साेपे असून, महाविकास आघाडीसाठी मात्र कठीण आहे. अर्थात भाजप काेणासाठी कशी भूमिका घेते, यावर नविडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे. भाजप सदस्य पक्षाच्या अंतमि आदेशानंतरच त्यानुसार भूमिका घेणार आहेत. गत दीड दशकापेक्षा जास्त कालावधीपासून जि.प.वर वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत ‘वंचित’ने स्वबळावर लढत सर्वाधिक जागांवर वजिय प्राप्त केला हाेता. आेबीसी आरक्षण संपुष्टात आल्यानंतर १४ जागांसाठी पुन्हा नविडणूक झाली हाेती. त्यानंतर ऑक्टाेबर २०२१ मध्ये दाेन सभापती पदांसाठी नविडणूक झाली हाेती. यात महाविकास आघाडीतर्फे प्रहार व एक अपक्षाला नविडणूक रिंगणात उतरवण्यात आले हाेते. यात भाजपने प्रहार व अपक्षाला साथ दिल्याने ‘वंचित’चा पराभव झाला हाेता. सध्या सहा पैकी चार पदे (अध्यक्ष, उपाध्यक्ष व दाेन सभापती) वंचितकडे आिण दाेन सभापती पदे महाविकास आघाडीकडे (प्रहार व अपक्ष) आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या बदलत्या भूमिका गतवर्षी ऑक्टाेबरमध्ये झालेल्या दाेन सभापतिपदांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपच्या मदतीने वजिय मिळवला हाेता. यंदा ऑगस्टमध्ये झालेल्या डीपीसीच्या निवडणुकीत भाजप-‘वंचित’ने एकमेकांना साथ दिल्याची चर्चा रंगली हाेती.
…त्यामुळे उत्सुकता लागली शिगेला
सन २०२०च्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या नविडणुकीत वंचित विरूद्ध शविसेना-काँग्रेस, राकाँ, प्रहार, अपक्ष यांचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडीत लढत झाली हाेती. ‘वंचित’ला २५ तर महाविकास आघाडीला २१ मतं मिळाली हाेती. भाजपने मतदानापूर्वीच सभागृहातून बहिर्गमन केल्याने ‘वंचित’च्या वजियाचा मार्ग माेकळा झाला हाेता. या वेळी भाजप काेणती भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. सन २०१६ च्या नविडणुकीत राकाँने ‘वंचित’ला साथ दिली हाेती. मात्र सध्या राकाँ महाविकास आघाडीत आहे. बार्शीटाकळी व अकाेट येथील पंचायत समिती सभापती-उपसभापतीपदाच्या निवडणुकीत ‘वंचित’ला बाजूला ठेवण्यासाठी महाविकास आघाडी व भाजप एकत्र आले. त्यामुळे आता हाच प्रयाेग जि.प.मध्येही हाेणार कि नाही, हे साेमवारी दुपारनंतर स्पष्ट हाेईल.
असे आहे सध्याचे सदस्यांचे संख्याबळ
वंचित बहुजन आघाडी २५
शविसेना १२
भाजप ५
कांॅग्रेस ४
राष्ट्रवादी काँग्रेस ०४
प्रहार जनशक्ति पक्ष ०१
अपक्ष २











