अकाेला : जिल्ह्यातील सात पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती पदासाठी नविडणुकीची प्रक्रिया रवविारी झाली. चार ठिकाणच्या सभापतिपदी वंचित बहुजन आघाडीचे, दाेन ठिकाणी शविसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि एका सभापतीदावर भाजपच्या उमेदवाराचा वजियी झाला. उपसभापतीच्या नविडणुकीत तीन ठिकाणी वंचित आघाडी, शविसेना एक तर भाजपचा दाेन ठिकाणी वजिय झाला. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी काेरीच राहिली. अकाेल्यात ‘वंचित’कडे स्पष्ट बहुमत असतानाही त्यांच्याकडे सभापतिपदासाठी अनुसूचित जमाती (महिला) उमेदवार नसल्याने या पदासाठीची एकमेव सदस्या भाजपकडे असल्याने तेथे कमळ फुलले. बार्शीटाकळी व अकाेट येथे सत्ताधारी ‘वंचित’ला बाजूला ठेवत शविसेना, भाजप, काँग्रेस, प्रहार जनशक्ति पक्ष एकत्र आले. अकाेट व बार्शीटाकळीमध्ये शविसेना- भाजपचे उमेदवार वजियी झाले. पंचायत समिती सभापती पदाकरीता लागू असलेला आरक्षण कालावधी समाप्त झाल्यानंतर लगतच्या दविसांपासून उर्वरित अडीच वर्ष कालावधीसाठी आरक्षण सोडत गत आठवड्यात जाहीर झाली हाेती. त्यानंतर रवविारी सभापती व उपसभापतीपदाच्या नविडणुकीसाठी विशेष सभा आयाेजित करण्यात आली. सभापतीपद हे अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव हाेते. सभापतीपदासाठी भाजपच्या सुलभा सोळंके यांचा एकमेव अर्ज हाेता. उपसभापतीपदासाठी ‘वंचित’चे अजय शेगाेकार व शविसेनेचे भास्कर अंभाेरे यांची अर्ज भरला हाेता. अंभाेरे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे उर्वरित दाेन्ही उमेदवार बनिविराेध नविडून आले. सभेचे कामकाज महसूल अधिकाऱ्यांनी केले. त्यांना स्थानिक पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. नविडणूक प्रक्रिया झाल्यानंतर भाजप व ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला. या वेळी भाजपचे आमदार रणधीर सावरकर, गणेश अंधारे, अंबादास उमाळे, अशोक गावंडे, राजू नागमते, राजेश रावणकर, दत्तू पाटील, मधु करपाटकर, तेजराव थोरात, वैभव माेहाेरे, माधव मानकर, प्रवीण हगवणे ,अमरसिंग भोसले, उमेश पवार आदी उपस्थित हाेते. ‘वंचित’कडून करण्यात आलेल्या जल्लाेषाच्या वेळी सुकाणू समितचे दनिकरराव खंडारे, गजानन गवई, मावळते सभापती राजेश वावकार, प्रभा सिरसाट, शाेभा शेळके, पराग गवई, दीपक गवई आदी उपस्थित हाेते.
स्थानिक रणनीतीचा बसला फटका
२०२० मधील नविडणुकीत तेल्हारा, अकाेट, बाळापूर, अकाेला पंचायत समित्यांवर वंचित आघाडीने एकहाती वजिय मिळवला हाेता. उर्वरित अडीच वर्षासाठी रवविारी निडणुकीची प्रक्रिया झाली. मात्र संख्याबळ जास्त असले तरी अकाेल्यात अनुसूचित जाती (महिला) या राखीव पदाचा उमेदवार नसल्याने, अकाेट, बार्शीटाकळी येथे स्थानिक रणनीतीचा फटका ‘वंचित’ला बसला.
असा लागला ‘निकाल’
पंचायत समिती सभापती (पक्ष) उपसभापती
अकाेला भाजप वंचित बहुजन आघाडी
अकाेट शविसेना भाजप
बार्शीटाकळी शविसेना भाजप
मूर्तजिापूर वंचित शविसेना
पातूर वंचित वंचित
बाळापूर वंचित वंचित
तेल्हारा वंचित वंचित











