अकोला : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत हवामान आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहारसाठी अकोला जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. आंबिया बहारसाठी फळबागा असलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग, आंबिया बहारपैकी एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. उत्पादनक्षम फळबागानांच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. संत्रा पिकाचे उत्पादनक्षम वय ३ वर्ष, मोसंबी ३ वर्ष, डाळिंब २ वर्ष आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीस निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका निहाय प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे. यात जिल्हा प्रतिनिधी सुनील भालेराव-९९२१२५००३३, तालुका प्रतिनिधी(अकोला,मूर् तीजापूर,बार्शीटाकळी) शुभम हरणे-८०८७९०३१७१, तालुका प्रतिनिधी(अकोट,तेल्ह ारा) सुजय निपाणे-७०५७५०२८७०, तालुका प्रतिनिधी, (पातूर,बाळापुर) रूपाली गाडगे-८९७६९२९४३० यांच्याशी संपर्क साधावा, माहितीकरिता तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी,उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला यांनी केले आहे.











