सतीश मवाळ
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
मेहकर : तालुक्यातील घाटबोरी येथील देशी दारू समोर भरत असलेल्या अंगणवाडीचे तात्काळ स्थानांतर करण्यासाठी राजेश साहेबराव नवले यांनी एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालय मेहकर तक्रार अर्ज देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे. मेहकर अंतर्गत येत असलेल्या घाटबोरी गावामध्ये लहान मुलाची भरत असलेली अंगणवाडी गावातील देशी दारूच्या दुकान समोर असलेल्याने लहान मुलावर त्याचा विपरीत परिणाम होत असून अनेक वाईट गोष्टीचा सामना त्यांना करावा लागत आहे . अंगणवाडीची जागा बदलून दुसरीकडे स्थलांतर करण्यात यावे असे गावकर्याच्या वतीने दि १४/९/२२ रोजी दिलेल्या तक्रारी मध्ये म्हटले आहे. अन्यथा गावकऱ्यांच्या व पालकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल
चौकट
राजेश नवले यांचा तक्रार अर्ज कार्यालय प्राप्त झाला असून सत्य परिस्थिती अवगत करून त्याबाबत अहवाल आल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी अंगणवाडीचे स्थानांतर करण्यात येईल. : नवनाथ गणतोडे, एकात्मक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालय मेहकर