अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : डॉ. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग,राष्ट्रीय सेवा योजना आणि तहसील कार्यालय पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती अभियान दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोज गुरुवारला संपन्न झाले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. किरण. एस. खंडारे हे होते. याप्रसंगी विचारपिठावर श्री विजय खेळकर नायब तहसीलदार पातुर, श्री पुरुषोत्तम पाचपोरव श्री भूषण बोर्डे तहसील कार्यालय पातुर,राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.दिपाली घोगरे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करुन झाली. मोहम्मद जमील यांनी स्वागत गीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्रा.अरविंद भोंगळे यांनी केले.पुरुषोत्तम पाचपोर यांनी केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकार यांच्या निर्देशाप्रमाणे विद्यार्थ्यांना आधार कार्डचे मतदान कार्ड सोबत संलग्निकरण कशा प्रकारे केले जाते याचे मोबाईल प्रात्यक्षिक करून दाखवले. नायब तहसीलदार श्री विजय खेडकर यांनी या उपक्रमाचे लोकशाहीच्या बळकटी करणासाठी असलेले महत्त्व प्रतिपादित केले. प्राचार्य डॉ. किरण.एस.खंडारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये भारतीय लोकशाही च्या विकासाचा आलेख मांडला त्याच प्रकारे देशाच्या संविधानीय प्रक्रियेत मतदार हाच देशाच्या जडणघडणीचा शिल्पकार आहे असे विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समिती समन्वयक डॅा.प्रा.अरविंद भोंगळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.उज्ज्वला मनवर यांनी केले.या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. याप्रसंगी प्रा.हर्षद एकबोटे, डॉ.अनिल देशमुख,प्रा.सारिका पाचराउत तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.