कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी,अकोट
अकोट : पोलीस स्टेशन अकोट ग्रामीणकडून ग्रामीण भागातील चोरीच्या, घरफोडीच्या, गोवंश चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक अकोला श्री जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत, मा. सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट श्रीमती रितू खोखर ह्यांचे मार्गदर्शनाखाली ” माझे गाव, माझी सुरक्षा” ही योजना राबविण्यात येत असून त्या योजनेअंतर्गत दिनांक १/९/२०२२ चे रात्री पो स्टे अकोट ग्रामीणचे हद्दीतील ग्राम उमरा येथे पी एस आय श्री विष्णू बोडखे ,ए एस आय श्री लिखार,चालक श्री अस्वार,होमगार्ड श्री श्याम ताडे,होमगार्ड श्री डहाके,श्याम सूर्जुसे ह्यांनी पो स्टे अकोट ग्रामीण हद्दीतील ग्रामीण भागातील चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे उद्देशाने ग्रामीण भागात तयार करण्यात आलेल्या ग्राम सुरक्षा दल व गणेश मंडळाचे सदस्यांसोबत ग्राम उमरा ह्या गावात रात्री गस्त करण्यात केली.
तसेच ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य तसेच गणेश मंडळाचे सदस्य व गावातील इतर नागरिक ह्यांना रोज गस्त घालनेबाबत व गस्त कशी करावी ह्या बाबत सूचना देण्यात आल्यात. तसेच मालमत्तेची सुरक्षा कशी करावी, चोरीच्या व घरफोडीच्या घटनांना आळा कसा घालावा तसेच सायबर गुन्ह्यापासून कसे सुरक्षित राहावे ह्या बाबत पोलीस उप निरीक्षक श्री विष्णू बोडखे ह्यांनी गावातील नागरिकांना व युवकांना मार्गदर्शन केले.