अविनाश पोहरे / चिफ ब्युरो, अकोला
अकोला – दि. २ जुलै : २०२१ स्थानिक श्री.शिवाजी महाविद्यालय, अकोला च्या मराठी विभागातील सहयोगी प्राध्यापक संजय सुखदेवराव पोहरे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने मराठी या विषयात आचार्य पदवी देवून सन्मानित केले आहे. महाराष्ट्रातील प्रसिध्द कवी डॅा. श्रीकृष्ण राऊत यांच्या मार्गदर्शनात “सुरेश भटांनंतर विदर्भातील मराठी गझल-एक चिकित्सक अभ्यास” या विषयावर त्यांनी संशोधन करून प्रबंध सादर केला होता. त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील व परिवारास दिले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. आर.एम भिसे यांनी त्यांचे अभिंनदन केले आहे. महाविद्यालयातील तसेचं मराठी विभागातील प्रा.विनय पैकीणे, डॅा आशिष राऊत,डॅा. सुलभा खर्चे, डॅा. श्रध्दा पाटील, डॅा. अशोक इंगळे,डॅा. उमेश घोडेस्वार, डॅा मनोहर वासनिक, प्रा. राहुल माहुरे, प्रा. ॲड. आकाश हराळ यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयातील व शहरातील सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


