महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.2:-घरगुती गॅस, इंधन व रासायनिक खते या वस्तुंच्या किंमतीत केंद्र सरकारने केलेल्या वाढीच्या विरोधात भद्रावती येथील टप्पा चौकात राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीतर्फे आज दि.२ जून रोजी निदर्शने करुन तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले. देशातील प्रत्येक नागरीक गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटापासुन त्रस्त आहे. कोराना रोगामुळे औषधे,रूगणालयाचे खर्च,कडक संचारबंदी यामुळे समाजातील प्रतेक घटक अपाला उदरनिर्वाह करण्यासाठी धडपड करीत आहे. अशा परिस्थितीत केन्द्र सरकार मदत करण्याऐवजी इंधन दरवाढ करून जनतेची लुट करून सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास देत आहे.आता रसायनिक खतांच्या किंमतीत ७० टक्के वाढ केल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. वाढत्या किंमतीमुळे शेतकरी हा मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. देशाच्या प्रत्येक घटकाला माहागाई पासुन मुक्त करून इंधन दरवाढ तसेच घरगुती गॅस यांच्या वाढवलेल्या किंमती तात्काळ मागे घेण्यात याव्या. तसेच रसायनिक खतांची केलेली दरवाढ मागे घेऊन शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.सदर आंदोलन भद्रावती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख व तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष अँड.युवराज धानोरकर,शहर अध्यक्ष सुनिल महाले,असंघटीत कामगार जिल्हा अध्यक्ष फयाज शेख, तालुका महिला अध्यक्षा दुर्गा बिश्वास, शहर महिला अध्यक्षा साबिया देवगडे,युवक तालुका अध्यक्ष स्वप्निल लांबट, माजी पं.स. सभापती धनराज विरूटकर,संजय आस्वले,रोहीत वाभिटकर ,युवक शहर अध्यक्ष रोहन कुटेमाटे, रवी नागपुरे,पनवेल शेंडे, संदीप चौधरी, रोशन कोमरेड्डीवार,साहील देवगडे, कुणाल मेंढे, निलेश जगताप,प्रमोद वावरे, आशिष लिपटे उपस्थित होते.